महिलांशी शारीरक संबंध, बलात्कार आणि धर्मांतर

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नोएडा,
Love Jihad in Noida उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये लव्ह जिहादाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बिसरख येथील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल करत आरोप केला की, आरोपी पुरुषाने आपली खरी ओळख लपवून तिला प्रेमसंबंधात अडकवले, शारीरिक अत्याचार केले आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला. तिने सांगितले की, आरोपीने तिच्यासोबतचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला केस मागे घेण्यासही प्रवृत्त केले.
 
 
Love Jihad in Noida
पीडितेने पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, आरोपी हारून खान महिलांना त्याचा धर्म लपवून आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून, धर्मांतर करण्यासाठी मानसिक दबाव आणत असे. जर त्यांनी नकार दिला, तर त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ उघड करण्याची धमकी तो देत असे. तक्रारीत असेही नमूद आहे की हारून खान यापूर्वीही अशाच प्रकारच्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात तुरुंगवास भोगून आल्याचे समोर आले आहे.
 
या तक्रारीवरून बिसरख पोलिस ठाण्याने तत्काळ गुन्हा नोंदवला. ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मनोज कुमार सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, पीडितेची तक्रार अत्यंत गंभीर आहे आणि आरोपीच्या नावावर पूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात हारून खानसह राजू खान, सिकंदर, कपिल खान, सहाना खान, गुडिया आणि दोन अज्ञात नातेवाईकांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांन तपास सुरू केला असून आरोपींच्या अटकेसाठी पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.