हिंगणघाट,
motor-pump-thief : कालव्यावर लावण्यात आलेल्या मोटरपंप चोरून नेणार्यांस हिंगणघाट पोलिसांनी जेरबंद केले. चोरट्यांकडून चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी मोटारपंप जप्त केला आहे.
गवा कोल्ही येथील रहिवासी नितीन ढगे यांनी ठेयाने केलेल्या आजंती शिवारातील शेतात सिंचनासाठी कालव्यावर मोटारपंप लावला होता. तो १० हजार रुपये किंमतीचा मोटारपंप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना उजेडात आल्यावर त्यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणघाट येथील गणेश घुमडे (३१) यास ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्यास त्याच्या साळ्याने मदत केल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. या चोरट्यांकडून २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात प्रशांत ठोबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहित साठे यांनी केली.