नवी दिल्ली,
Neha Kakkar's dirty deeds छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली गायिका नेहा कक्कर सध्या एका नवीन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहाने नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये केलेल्या स्टेजवरील कृतीमुळे प्रेक्षक आणि सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, नेहा 'तू प्यासा है' या गाण्यादरम्यान स्टेज तिने स्वतःच्या छातीवर पाणी टाकत नृत्य केले. या गाणं संपताना तिच्या स्टेजवरील कृती पाहून अनेक प्रेक्षकांना धक्का बसला आहे आणि काहींनी तिच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी नेहाच्या या कृतीला शोभत नसल्याचे म्हटले आहे.

एका आऊटपुटवरुन चर्चा सुरू झाली आहे की, जर नेहा कक्करसारख्या प्रसिद्ध आणि विवाहित गायिकेने अशा प्रकारे वागत असतील, तर सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांच्या क्लीव्हेज किंवा डान्स मूव्ह दाखवणाऱ्या तरुणींविषयी काय म्हणावे? काहींनी नेहाने केलेली कृती अश्लील प्रकारातली असल्याचेही नमूद केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नेहाच्या चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.