नागपूर,
winter-session : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सर्वांगीण तयारीसंदर्भात उद्या, रविवार ७ डिसेंबर रोजी विधान भवन, येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता मंत्रीपरिषद सभागृह, इमारत (पहिला मजला) येथे होणार्या या बैठकीत सभापती राम शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे विशेष उपस्थित राहणार आहेत. तर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ऑनलाईन उपस्थित राहतील. अधिवेशनादरम्यान सुरळीत कामकाज, निवास व्यवस्था, पत्रकारांसाठी असलेली सोय आणि विविध प्रशासकीय तयारीचा मागोवा बैठकीत घेतल्या जाणार आहे.