तभा वृत्तसेवा
पुसद,
pusad-farmland-wild-boar : शेतशिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. रानडुक्कर शेतातील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी करीत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील शेतकèयांनी वनविभागासह तहसीलदार, तालुका कृषी अधिकाèयाला आभासी तक्रारी केल्या आहेत. परंतु आभासी तक्रारी करताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असल्यामुळे पंचनामे करण्यास उशीर होत आहे.
तालुक्यातील मारवाडी बु., बान्सी, कवडीपूर, वसंतवाडी, येहळा, येरंडा, कोप्रा (खु), सावंगी, पिंपळखुटा, मुंगशी, वनवारला, पिंपळगाव, चोंढी, हनवतखेडा, सांडवा, मांडवा, कारला, धनसळ, मनसळसह इतर शेत शिवारातील पिकांची रानडुकरांकडून नासाडी होत आहे. त्यामुळे शेत शिवारातील शेतकèयांना 100 टक्के सबसिडीवर आधारित झटका मशीन आणि जाळीचे कुंपण योजनेद्वारे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकèयाकडून होत आहे.
शेतातील उभ्या पिकांना यामध्ये तूर, चना, कापूस, ऊस या पिकात रानडुकरापासून मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. त्यामुळे शेतकèयांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतपिकांना योग्य प्रकारे भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत रानडुकरांनी नुकसान केल्यामुळे झालेला खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे.
या परिस्थितीत शेतकèयांना रानडुकरांपासून पिकांना हाणी पोहोचू नये व रानडुकरांनी भविष्यातही शेत पिकांना हानी पोहोचू नये याकरिता वनाधिकारी, तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांनी तत्काळ त्यांच्या स्तरावर योग्य आदेश पारित करून तातडीने झटका मशिन आणि 100 टक्के सबसिडीवर आधारित जाळीच्या कुंपणाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी नंदकिशोर जामकर, नारायण पुलाते, संजय ठाकरे, बबलू कावडे, सुरेश ठाकरे, हितेश मस्के, निरंजन ठाकरे या शेतकèयांनी केली आहे.