तभा वृत्तसेवा
दारव्हा,
rashtrasant-tukadoji-maharaj : संत गजानन महाराज मंदिर संस्थान दारव्हा, येथे श्री गुरूदेव सेवा मंडळ छत्रपती शिवाजी नगर दारव्हा व दारव्हा तालुका यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57 वा पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात आला.
या सोहळ्यांतर्गत सामूहिक ध्यान, ग्रामसफाई, नामस्मरण, प्रार्थना, ग्रामगीता प्रचार, गुरूदेव सेवा प्रेमींचा सत्कार तसेच समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वप्रथम कलशस्थापना साहेबराव पुयाळ व सुलोचना पुयाळ यांच्याहस्ते करण्यात आली. त्यानंतर सामूदायिक ध्यान उद्धव रोकडे व दिनेश धारपवार यांनी घेतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूण सालोडकर तर उद्घाटक गणेश धर्माळे होते. प्रमुख अतिथी रमेश कचरे, डॉ. मदन पोटफोडे, शंकर जाधव उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक मधुकर खोडे यांचे मार्गदर्शन लाभले. कविता येणोलकर यांनी महिलोन्नती या विषयावर व पुजल कानकिरड यांनी बदलत चाललेली पिढी या विषयावर मार्गदर्शन केले. अरूण सालोडकर यांनी गुरूदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कार्य व देशसेवा या विषयावर मार्गदर्शन केले. गणेश धर्माळे, ताराचंद कंठाळे व दत्ता मार्कंड यांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी गुरूदेवप्रेमी पवन शिरनाथ व संध्या देशकरी यांचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी दारव्हा तालुक्यामधील महिला भजनी मंडळाची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये श्रीशिवाय महिला भजनी मंडळ भाजी मार्केट दारव्हा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन मंजली साखरकर यांनी केले. आभारप्रदर्शन पवन शिरनाथ यांनी केले.