पाकिस्तानचे तुकडे करूनच राहू…; मुनीरच्या सैन्याच्या गोळीबाराने संतापला तालिबान VIDEO

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
काबुल,  
taliban-enraged-by-munirs-army-firing अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवर पुन्हा तणाव उसळला असून शुक्रवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर तालिबान लढवय्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. स्पिन बोल्डक परिसरातील तालिबान कमांडरने थेट पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांना कठोर इशारा देत, “आमच्याशी पंगा घेण्याचा परिणाम पाकिस्तानच्या तुकड्यांत होईल,” असे म्हणत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 
 
 
taliban-enraged-by-munirs-army-firing
 
सत्ताधारी अफगाण तालिबानच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी वृत्त दिले की सीमेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार झाले. अफगाणिस्तानच्या दक्षिण कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्दाक सीमा क्रॉसिंगवर तालिबानी सैन्य आणि पाकिस्तानी सैन्यात ही चकमक झाली. गोळीबारात पाकिस्तानमधील काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी रात्री सीमेवर झालेल्या गोळीबाराची कबुली दोन्ही बाजूंनी दिली. taliban-enraged-by-munirs-army-firing पाकिस्तानी माध्यमांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दावा केला आहे की तालिबानी सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांचे तीन जवान जखमी झाले.
 
 पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तालिबाननेच प्रथम सीजफायर मोडून गोळीबार केला, तर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी उलट आरोप करत म्हटले की पाकिस्तानकडूनच प्रथम हल्ले झाले, त्यामुळे प्रत्युत्तर देणे भाग पडले. कंधार प्रदेशातील नागरिकांनीही गोळीबारात जीवितहानी झाल्याचे पुष्टी केली. पाकिस्तानने ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले आणि टीटीपीला लक्ष्य करण्याचा दावा केला. taliban-enraged-by-munirs-army-firing तेव्हापासून, दोन्ही बाजूंमध्ये अनेक वेळा संघर्ष झाला आहे. कतार आणि तुर्कीने दोन्ही देशांमधील शांतता करारात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. कतारमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती, परंतु सीमेवर गोळीबार सुरूच आहे.