तिहेरी तलाक पीडित नूरजहाँ बनली हिंदू!

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
बरेली,
Triple talaq victim Noor Jahan तिहेरी तलाकानंतर नूरजहाँने इस्लाम धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला आहे. या धर्मांतरानंतर तिने आपले नाव नूरजहाँवरून पूनम ठेवले. पूनमने बरेलीत धरमपालशी लग्न केले आणि या विवाह सोहळ्याचे विधी एका पुजाऱ्याने मंदिरात पार पाडले. दोन्ही कुटुंबांनी या लग्नात उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद दिला. तिहेरी तलाकामुळे व्यथित नूरजहाँने स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले. तिने स्पष्ट केले की तिचा पती तिहेरी तलाक दिल्यानंतर ती दिल्ली येथे गेली आणि एका खेळण्यांच्या कारखान्यात काम करताना धरमपालशी भेट झाली.
 

nurjaha  
काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नूरजहाँने सांगितले की तिला लहानपणापासूनच हिजाब आणि बुरखा आवडत नव्हते आणि हलालाची प्रथाही चुकीची वाटत होती. धर्मांतरानंतर तिने गंगाजल आणि गोमूत्र वापरून शुद्धीकरणाचे विधी केले आणि पूनम म्हणून हिंदू धर्म स्वीकारला. बरेली येथील ऋषी मुनी आश्रमात पंडित के.के. शंकधर यांनी पूनम आणि धरमपाल यांचे विधीपूर्वक लग्न सोहळा पार पाडला.