भय्याजी दाणी राष्ट्र सर्वतोपरी मानणारे देशभक्त

- पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांचे प्रतिपादन -पहिले गृहस्थ प्रचारक भय्याजी दाणींवरील व्हिडिओचे लोकार्पण

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
vilas-dangre : भय्याजी दाणी हे खऱ्या अर्थाने राष्ट्र सर्वतोपरी हा विचार करणारे होते देशभक्त होते, असे प्रतिपादन श्री नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद््मश्री डॉ. विलास डांगरे यांनी आज व्यक्त केले.
 
 
 
DAANI
 
 
 
‘असु अम्ही सुखाने पत्थर पायातील’ मालिकेंतर्गत रा.स्व. संघाचे पहिले गृहस्थ प्रचारक भय्याजी दाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित व्हिडिओचे लोकार्पण शतायुषी स्वयंसेवक दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब ताम्हण यांच्या हस्ते झाले. रा.स्व. संघ रामदासपेठ शाखा, दै. तरुण भारत व दाणी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम डॉ. विलास डांगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
 
 
संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, रामदासपेठ नगर संघचालक राजेश अवचट, प्रचारक रवींद्र भुसारी, संजय दाणी, मधुसुदन अलकरी, मिलींद रहाटगावकर व्यासपीठावर उपस्थित होते. पद््मश्री डॉ. विलास डांगरे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, प्रभाकर बळवंत उपाख्य भय्याजी दाणी खèया अर्थाने कर्मयोगी होते. खèया अर्थाने राष्ट्र सर्वतोपरी हा विचार करणारा माणूस, देशभक्त या भूमीवर आला. जेव्हा संघाचा प्रारंभ करण्यासाठी पहिल्या बैठकीमध्ये 17 विद्यार्थ्यांसह भय्याजींची उपस्थिती होती.
 
 
भविष्यामध्ये कोण-कोण संघाच्या कामात सहभागी होतील व काम करतील, ही डॉ. हेडगेवारांची दूरदृष्टी, विलक्षण बुद्धिमत्ता होती. भय्याजींना त्यांच्या वयाच्या सुरुवातीच्या कालखंडात ‘तुला काशीला जायचय, संघाचे काम कराचय’ असे डॉक्टरांनी सांगितले. कोणत्याही प्रकारची अडचण, भीती न ठेवता केवळ डॉक्टरांनी म्हटलं आहे व तेही राष्ट्रासाठी, भारत मातेसाठी म्हटले आहे म्हणून भय्याजी काशीला गेले.
 
 
तेथे शाखा प्रारंभ केली, चांगल्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू केला. त्यांच्या नजरेतून गोळवलकर गुरुजींच्या रूपात उत्तुंग व्यक्तिमत्व संघात आले. त्यांना संघात आणण्याचे सर्वात मोठे योगदान भय्याजींचे होते. गुरुजींना डॉक्टरांनी नंतर सरसंघचालक केले. भय्याजींची दृष्टी संघकार्यासाठी भक्कमपणे काम करीत होती. बंदीकाळात सहकार्यवाह म्हणून जबाबदारी संयमाने, ताकदीने सांभाळली. त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या विचारांचे चिंतन झाल्यानंतर आपलेही योगदान रहावे, हीच खऱ्या अर्थाने भय्याजींना श्रद्धांजली ठरेल, हे डॉ. विलास डांगरे यांनी अधोरेखित केले.
 
 
संजय दाणी यांनीही मनोगत व्यक्त केले. मधुसुदन अलकरी, देवेंद्र इलपाची, दीप गेडाम, सुनील अग्निहोत्री यांचा सत्कार करण्यात आला. मृण्मयी व अमर कुळकर्णी व इतरांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. नरकेसरी प्रकाशनच्या संचालिका मीरा कडबे, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक सुधीर पाठक, निलेश साठे, जगदीश सुकळीकर, अविनाश संगवई, विनय दाणी, संजय बंगाले, प्रा. श्रीकांत पांडे, सागर कुळकर्णी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
श्रीधर गाडगे
 
 
शतकाच्या उंबरठ्यावर जेव्हा संघाच्या इतिहासाचा आपण धांडोळा घेतो, त्यावेळी ही जी शंभर वर्षांची अखंड साधना बघताना लक्षात येते की, ती साधना जगणारी माणसं निर्माण झालीत. बापू महाशब्देंच्या ‘असु अम्ही सुखाने पत्थर पायातील’ या गीतातील प्रत्येक शब्द जगणारी अशी ही माणसं आहेत.
 
 
संघकार्य पूर्ण होण्यासाठी डॉ. हेडगेवार यांच्यासोबत जीवनपुष्पामध्ये स्पष्टपणे झळकणारे जीवनपुष्प म्हणजे भय्याजी दाणी. 58 वर्षांच्या आयुष्यात दैदिप्यमान कार्य त्यांनी केले. ते लहान असताना लोकमान्य टिळकांच्या मांडीवर खेळले आहेत. घरातूनच देशभक्तीचे बाळकडू त्यांना मिळाले. त्यांनी मध्यप्रदेशात संघाचे मजबुत जाळे विणले. संघाचे आज जगभर नाव दिसते. त्याच्या मुळात, या संघ मंदिराच्या पायथ्याशी कित्येकांनी स्वतःला गाडून घेतले, संसारावरती तुळशीपत्र ठेवली, याकडे श्रीधर गाडगे यांनी लक्ष वेधले.