विराटची आध्यात्मिक वाटचाल..सिंहचलमच्या चरणी नतमस्तक

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
विशाखापट्टणम,
Virat Kohli to Singhalam दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकताच भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली विशाखापट्टणममधील सिंहचलम मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. शनिवारी भारताने २-१ असा मालिका विजय मिळवल्यानंतर कोहलीने मंदिरात जाऊन भगवान वराह लक्ष्मी नरसिंहांच्या चरणी माथा टेकला. सोशल मीडियावर आलेल्या फोटोंमध्ये तो फुलांचा हार घालून मंदिराच्या आवारात प्रवेश करताना दिसत आहे. त्याच्या दर्शनाचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
 
 
Virat Kohli to Sinhachalam
 
टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोहली आता पूर्णपणे एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत आहे. पुढील वर्षी जानेवारी २०२६ मध्ये तो पुन्हा मैदानात उतरणार असून न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याची पुनरागमनाची चाहत्यांना उत्सुकता आहे. ही सामने वडोदरा, राजकोट आणि इंदूर येथे खेळले जाणार असून रोहित शर्मादेखील त्या मालिकेत कोहलीसोबत दिसणार आहे. मालिका विजयाच्या आनंदात कोहलीने मंदिरात जाऊन घेतलेले दर्शन त्याच्या श्रद्धाभावाचे आणखी एक उदाहरण ठरले.