विठोली येथील पुरसंरक्षक भिंतीचे बांधकाम चुकीच्या दिशेने

विठोली वरील पुराच्या धोयाची टांगती तलवार कायम

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
मानोरा,
Vitholi तालुयातील विठोली या राष्ट्रीय महामार्गावरील गावाला लागून असलेल्या खोराडी नदीवर शासनाकडून कोट्यावधी रुपये देऊन बांधण्यात आलेली पूर संरक्षक भिंत ज्या ठिकाणी गरजेची होती त्या बाजूने न बांधता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदार यांनी आर्थिक अनियमित्ता करून काही शेतकर्‍यांच्या भल्यासाठी चुकीच्या दिशेला बांधल्याने विठोली या गावावरील पुराचा धोका कायम राहणार असून, निकृष्ट व चुकीच्या दिशेने बांधलेल्या या पूर प्रतिबंधक भिंतीमुळे शासनाच्या मूळ उद्देशाला आणि यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीला सुरूंग लावल्याचे आरोप करणारी तक्रार स्थानिक नागरिकाने जिल्हा प्रशासनाकडे करून संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 

Vitholi, flood protection wall, Khoredi river, 
विठोली येथील शेतकरी महेंद्रकुमार प्रल्हाद बारशे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये २०२३ यावर्षी खोराडी नदीला आलेल्या महापुरामुळे या नदी तीरावरील विठोली गावातील असंख्य घरे व मालमत्तेला तथा आजूबाजूच्या शेत शिवाराला प्रचंड नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी विठोलीच्या बाजूने पूर प्रतिबंधक भिंत बांधण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे स्थानिक नागरिक तथा काही सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलने व लेखी पाठपुरावा करण्यात आला होता. वाढता जनक्षोभ लक्ष्यात घेऊन जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने विठोली या गावातील खोराडी नदीवर बांधण्यात आलेली पूर प्रतिबंधक भिंत उत्तर बाजूने बांधणे गरजेचे असताना चुकीच्या व भलत्याच दक्षिण बाजूने काही शेतकर्‍यांच्या लाभासाठी स्वतःचे हात ओले करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी कंत्राटदारांमार्फक बांधल्याचे गंभीर आरोप निवेदनकर्त्याने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.कोट्यवधी रुपयाची निधी असलेली ही पूर प्रतिबंधक भिंत बांधताना सुद्धा कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेने बेकायदेशीर गौणखणीजाचा वापर करून शासनाच्या रॉयल्टीरूपी महसुलाला चुना लावण्याचा आरोप सुद्धा शेतकरी बारसे यांनी केला आहे.
विठोली गाव आणि या बाजूचे शेतकरी यांना पुराच्या धोयात ढकलणार्‍या सबंधित कंत्राटदाराचे देयक संपूर्ण चौकशी होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये व या कामावर प्रशासकीय देखरेख व नियंत्रण करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येऊन शासकीय निधीचा अपव्यय करणार्‍या कंत्राटदाराला काळा यादी टाकून त्याची कडून मंजूर रक्कम वसूल करण्यात यावी तथा विठोलीच्या बाजूने उत्तर दिशेने ही पूर संरक्षक भिंत उभारण्यात येण्याची मागणी सुद्धा स्थानिक शेतकर्‍याने प्रशासनाकडे केली आहे.