‘त्या’ अपघातातील तिसऱ्या प्रवाशाचा मृत्यू

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
यवतमाळ,
bus-accident : गुरुवारी रात्री मारेगाव तालुक्यातील जळका फाटा येथे झालेल्या ट्रक व चंद्रपूर-यवतमाळ बसच्या भीषण अपघातातील तिसèया प्रवाशाचा गुरुवार, 5 डिसेंबर रोजी उपचारार्थ यवतमाळला नेत असताना त्याचा मृत्यू झाला. प्रसाद अरविंद चिंचोळकर (वय 27) असे मृतकाचे नाव आहे. मेटीखेडा (ता. कळंब) येथील रहिवासी असून तो तबलावादक होता. तो एका भजनाच्या कार्यक्रमाला जात असताना काळाने त्याचा घात केला. या युवकाचा उपचारार्थ यवतमाळला नेत असताना मृत्यू झाला. त्याच्यामागे आई, वडील, दोन बहिणी आणि मोठा परिवार आहे.
 
 

y6Dec-Prasad-Chincholkar