तभा वृत्तसेवा
उमरखेड,
criminals-in-exile : शहरात दहशत निर्माण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरणाèया एका सराईत गुन्हेगारास एक वर्षाकरिता यवतमाळसह नांदेड व वाशिम या तीन जिल्ह्यांच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांनी आदेश काढून केली आहे.
पोलिस ठाणे उमरखेड हद्दीतील आरिशोद्दीन मो. तारकोद्दीन खतीब (वय 23, दादूमिया दर्ग्याजवळ, आझाद वॉर्ड, उमरखेड) हा चोरी, गंभीर दुखापत करणे तसेच जातीय तेढ निर्माण करणे अशा स्वरूपाचे गुन्हे वारंवार करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
मात्र, त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा न झाल्याने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर उमरखेड पोलिसांनी तडीपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाèयांकडे सादर केला होता. त्यानुसार 4 डिसेंबर रोजी उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांनी संबंधित इसमास एका वर्षाकरिता यवतमाळ तसेच नांदेड व वाशिम या शेजारील तीन जिल्ह्यांच्या हद्दीतून तडीपार करण्याचा आदेश पारित केला.
या आदेशाची अंमलबजावणी पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सागर इंगळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मधुकर पवार व संघशील टेंभरे यांनी केली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आली.