तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक संघटना शिक्षक व केंद्रप्रमुख जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने रविवार, 7 डिसेंबरला सहकार भवन आर्णी रोड यवतमाळ भव्य कार्यकर्ता मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये टीईटी सक्ती, विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी, अन्यायकारक संच मान्यता शासन निर्णय, शिक्षकाद्वारे विचारले जाणारे प्रश्न, या विषयावर चर्चसत्र सत्र, अमरावती विभागीय कार्यकारिणीची निवड, विविध मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश गुल्हाने, प्रमुख अतिथी म्हणून राज्याध्यक्ष अनिल पलांडे, राज्य सरचिटणीस मनोज मराठे, राज्य कार्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे, राज्य कोषाध्यक्ष श्यामकांत अहिररराव, जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र वेरूळकर यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील शिक्षक तथा पदवीधर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाèयांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरूळकर यांनी केले आहे.