भांडेवाडी एकीकृत घनकचरा प्रकल्प नागपूरसाठी महत्वाकांक्षी

आयुक्तांनी केली प्रकल्पाची पाहणी

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
नागपूर,
abhijeet-chaudhary : शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत चौधरी यांनी रविवारी पाहणी केली. हा प्रकल्प सुसबिडी कंपनीने कालबद्ध वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पंत, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, राजेंद्र जगताप, वृंदा ठाकूर, विकास रायबोले, सुसबिडीचे बिझनेस हेड विजय चिपळूणकर, प्रकल्प व्यवस्थापक पंकज कुमार, विनोद टंडन, नितीन पटवर्धन उपस्थित होते.
 
 

nmc 
 
 
 
कालबद्ध पद्धतीने कामे व्हावे - डॉ. चौधरी
 
यावेळी या फर्मेंटेशन टाकीमध्ये पाणी भरण्याच्या कामाला आजपासून सुरूवात झाली आहे. अतिरिक्त वसुमना पंत व कन्सलटंट वृंदा ठाकूर यांनी कळ दाबून या प्रक्रियेची सुरूवात केली. याशिवाय या प्रकल्पासाठी आवश्यक मेकॅनिकल व इलेक्ट्रिकलचे काम पूर्ण झाल्याची माहिती विजय चिपळूणकर यांनी दिली. या संपूर्ण प्रकल्पाची थ्री डी मॉडेलच्या माध्यमातून या प्रकल्पाची सद्य स्थिती तसेच आगामी काळात होणार्‍या कामाची माहिती आयुक्तांना दिली. या प्रकल्पामध्ये प्रक्रिया करुन बायोगॅस, सेंद्रिय खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून, त्याची विक्री करण्याचे अधिकार सुसबिडी यांना देण्यात आले आहेत.
हा प्रकल्प कार्यान्वित होण्याबद्दल कालबद्ध रितीने नियोजन करावे, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच भांडेवाडीतील ९ एकरमध्ये जमा झालेल्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. ही कामे कालबद्ध काळात पूर्ण करण्याचे नियोजन करावे, त्यानुसार कामाला गती द्यावी, असे ही निर्देश त्यांनी यावेळी दिली.