नागरिकाभिमुख सेवा देण्यासाठी सर्वांनी जीपीआर प्रणालीचा वापर करावा: जिल्हाधिकारी

‘दाखले घरपोच’ उपक्रमाला प्रारंभ होणार

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
वाशीम, 
yogesh-kumbhejkar : कार्यक्षम आणि पारदर्शक महसूल प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा समन्वय अत्यावश्यक आहे. नागरिकाभिमुख सेवा देण्यासाठी सर्वांनी जीपीआर प्रणालीचा अचूक व परिणामकारक वापर करावा. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 
 
KL
 
 
 
जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ६ डिसेंबर रोजी जीपीआर प्रणाली संदर्भातील अभासी प्रशिक्षण सभा आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहायक महसूल अधिकारी तसेच महसूल सहाय्यक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.
 
 
प्रशिक्षणाच्या प्रारंभी जिल्हाधिकार्‍यांनी महसूल प्रशासनाच्या कामकाजात जीपीआर प्रणालीचे महत्व, भूमी अभिलेख व नोंदींची अचूकता, पारदर्शकता वाढविणे तसेच प्रक्रियांना वेग देणे, तांत्रिक पायाभूत सुविधांचा योग्य वापर केल्यास शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी शय होईल आणि नागरिकांना सेवा देण्याचा दर्जा उंचावेल असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रशिक्षणादरम्यान अधिग्रहण, मोजणी, नकाशे अद्ययावत करणे, तांत्रिक माहिती भरण्याची पद्धत, प्रत्यक्ष क्षेत्रीय वापर, डेटा पडताळणी व अहवाल सादरीकरणाची प्रक्रिया यांचे सविस्तर प्रात्यक्षिक देण्यात आले. सादरीकरणातील समस्यांवर उपाययोजना, सामान्य त्रुटी व त्यांना टाळण्याचे मार्ग याबाबतही तज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिले.
 
 
तंत्रज्ञान आधारित महसूल व्यवस्थापन हा काळाचा महत्त्वाचा आग्रह असून सर्व अधिकार्‍यांनी सातत्यपूर्ण प्रगती साधावी. प्रशिक्षणातील उपस्थितीचा एकत्रित अहवाल सोमवारी सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले व प्रणालीचा प्रभावी वापर करण्याचा निर्धार व्यक्त केला. सादरीकरण जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांनी केले. याबाबत शासनस्तरावरून सदर कार्यप्रणाली लागू करण्यात येणार आहे.