नागपूर,
Dr. Babasaheb Ambedkar महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी संचालनालय विस्तार शिक्षण कार्यालयातही प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
या वेळी अधिष्ठाता डॉ. भूषण रामटेके, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. सी. नंदेश्वर, उपकुलसचिव डॉ. अजय गावंडे, तांत्रिक अधिकारी डॉ. महेश जावळे, Dr. Babasaheb Ambedkar डॉ. संजय गोडबोले, डॉ. गिरीधर शेंडे, डॉ. सरिपुत लांडगे, डॉ. गीतांजली धुमे यांसह कास्टट्राइब माफसू एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सौजन्य:प्रवीण बागडे,संपर्क मित्र