वर्धा,
arvi-police : मद्यधुंद अवस्थेत धामधुम करून परिसरातील शांतता भंग करीत असलेल्यांची आर्वी पोलिसांनी चांगलीच जिरवली. चार वेगवेगळ्या ठिकाणी ६ रोजी पोलिसांनी कारवाई करून चौघांवर गुन्हे दाखल केले.
पहिली कारवाई आर्वी-पुलगाव मार्गावर खुबगाव येथे करण्यात आली. येथे पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील प्रफुल्ल वनवे रा. खुबगाव यास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. दुसरी कारवाई आर्वीच्या पंचवटी परिसरात करण्यात आली. येथे रामू वाकडे रा. सावळापूर यास मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर सावळापूर बसस्थानक परिसरातून पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील प्रदीप बागर रा. सावळापूर याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. चौथी कारवाई आर्वीच्या इंदिरा मार्केट परिसरात करण्यात आली. येथे पोलिसांनी मध्यधुंद अवस्थेतील रवी चव्हाण याला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.