मुंबई,
Eknath Shinde आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली जोर पकडत आहेत. पक्षांतराची साखळी सुरु झाली असून नेते वेगवेगळ्या पक्षांकडे वळत आहेत. याच दरम्यान, डोंबिवलीत महत्त्वपूर्ण राजकीय कार्यक्रम पार पडला, जिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले आणि शिवसेनेत एका महिला नेत्याने प्रवेश केला.
डोंबिवली पश्चिमेत माझी नगरसेवक विकास मात्रे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर शिवसेनेच्या तिरंगी झेंड्याखाली मंगला सुळे यांनी प्रवेश केला. मंगला सुळे यांचा हा प्रवेश विशेष महत्वाचा ठरतो, कारण त्या याआधी भाजपच्या माझी नगरसेविका होत्या. आता त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना महत्त्वाचे संदेश दिले. त्यांनी म्हटले की, "मी जिथे जिथे सभा करतो, कार्यक्रम करतो तिथे लाडक्या बहिणींची संध्या पहायला मिळते. लाडकी बहीण योजना महायुती विसरु शकणार नाही आणि विरोधकही हे विसरू शकणार नाहीत." शिंदे म्हणाले की, महायुतीतर्फे विविध विकासकामांचा मोठा पाया ठेवण्यात आला आहे. "दिलेला शब्द मी पाळणारा आहे आणि महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे," असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या दिवशी डोंबिवली MIDC अंतर्गत सावळाराम क्रीडा संकुलाच्या लोकार्पणासह इतर विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले. उपमुख्यमंत्री शिंदे सोबत मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी महायुतीच्या काळात MMRDA च्या निधीमुळे या शहरांना अनेक प्रकल्प मिळाले असल्याचेही अधोरेखित केले.राजकीय विश्लेषकांच्या मते, मंगला सुळे यांचा शिवसेनेत प्रवेश आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणनितीवर प्रभाव टाकणार आहे. पक्षांतर आणि विकासकामांचा ठळक प्रदर्शन या दोन्ही गोष्टी निवडणूक परिणामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.