नागपूर,
acharya-devvrat : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे सायंकाळी नागपुरात आगमन झाले. पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर ते प्रथमच नागपूर भेटीवर आले आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या आगमनानंतर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी विनायक महामुनी यांनी त्यांचे स्वागत केले.