मोठी दुर्घटना! अचानक कोसळले घर; २५ महिला जखमी

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
हिमाचल
house collapse हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील चुरा उपविभागात शनिवारी दुपारी एक गंभीर दुर्घटना घडली. जांगरा ग्रामपंचायतीतील शावा गावात लग्न समारंभादरम्यान पारंपारिक नृत्यात सहभागी झालेल्या महिलांवर मातीचं जुनं घर कोसळलं. या अपघातात सुमारे २० ते २५ महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या तीसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 

house collapse  
ही घटना शनिवार, ६ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. लग्नाच्या पाहुण्यांची गर्दी असताना महिलांचे पारंपारिक नृत्य सुरू होते. दरम्यान, घराचा एक खांब अचानक तुटला आणि क्षणार्धात संपूर्ण छत कोसळलं. घर जुनं आणि कच्चं असल्यामुळे ते भार सहन करू न शकल्याची माहिती स्थानिकांनी दिली. छत कोसळताच, नृत्यात मग्न असलेल्या महिला मातीखाली गाडल्या गेल्या आणि घटनास्थळी आरडाओरडा सुरू झाला.
दुर्घटनेचा एक house collapse व्हिडीओही समोर आला असून त्यात महिला नाचत असल्याचे आणि काही क्षणांतच छत कोसळल्याचे दृश्य दिसतात. स्थानिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत अडकलेल्या महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांतच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, तीसा येथे हलवण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की सर्व जखमींवर आवश्यक उपचार सुरू आहेत आणि काहींची प्रकृती गंभीर आहे.रम्यान, एसडीएम चुराह राजेश कुमार जरीयाल यांनी दुर्घटनेची पुष्टी केली असून प्रशासकीय पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. जखमींना त्यांच्या स्थितीनुसार तातडीची मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितलं. पुढील चौकशीत घराची रचना व सुरक्षिततेबाबत तपास केला जाईल, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जाईल.प्रशासनाने गावकऱ्यांना आवाहन करत सांगितलं की जुन्या किंवा कच्च्या घरांमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करावी. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.