विनारॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त

महसूल विभागाची खैरी पॉईंट येथे कारवाई

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
राळेगाव, 
illegal-transportation : विनारॉयल्टी रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक राळेगाव महसूल पथकाने जप्त करून पोलिस ठाणे वडकी येथे लावण्यात आला. ही कारवाई राळेगाव महसूल पथकाच्या वतीने 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान तालुक्यातील खैरी पॉइंट येथे करण्यात आली.
 
 
 
y7Dec-Hiywa
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातून विना रॉयल्टीने रेती भरून येत असलेला एमएच29 बीई8832 या क्रमांकाचा हायवा ट्रक कोसारा येथून खैरीकडे येत असताना राळेगाव महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला.
 
 
चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना नसून विनारॉयल्टी रेती सोईट रेतीघाटातून भरून आणल्याचे चालकाने सांगितले. यावेळी महसूल विभागाच्या पथकाने 8 ब्रास रेतीने भरून असलेला हायवा ट्रक जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी वडकी पोलिस ठाण्यात लावण्यात आला.
 
 
ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी दिलीप चिडे, ग्राममहसूल अधिकारी नितीन जुमनाके, महसूलसेवक दीपक खिरटकर, उमेश चांदेकर, मनोज आत्राम यांनी केली.