मालेगाव,
harassment-case : येथील बत्तीस वर्षीय विवाहीत महिलेने तिच्या सासरच्या विरुद्ध ७ जणाविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल मालेगांव पोलिस स्टेशनला ६ डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन सासारकडील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी शबाना परवीन आशिक अली शहा राहणार गांधीनगर मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या सध्या मालेगाव येथे राहत असून, त्यांचे लग्न २७ एप्रिल २०१७ रोजी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे आशिक अली शहा मन्सूर अली शहा यांच्याशी मालेगाव येथे झाले. विवाह मध्ये सासरच्या मंडळींना भेटवस्तू सोन्याचे दागिने तसेच इतर गृहपयोगी वस्तू आणि लग्न चांगल्या प्रकारे करून दिले. त्याच्या मागणी नुसार त्यांच्या वडिलांनी पतीला चार लाख रुपये किमतीच्या भेटवस्तू देऊन थाटामाटात लग्न केले. विवाह नंतर त्या सासरी नांदण्यासाठी गेल्या.
लग्नानंतर त्यांना एक मुलगा एक मुलगी झाली तोपर्यंत सासरची मंडळींनी यांनी त्यांच्याशी चांगला व्यवहार केला. त्यानंतर सासरच्या मंडळींची वागणूक बदलत गेली व मला माहेरून घर बांधण्यासाठी पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होते. नेहमी होणार्या त्रासामुळे त्यांनी याबाबतची माहिती वडिलांना दिली. वडिलांनी पुन्हा २०२४ मध्ये दीड लाख रुपये त्यांच्या पतीला दिले. मात्र, तरी सासरच्या मंडळींनी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. पुन्हा एकदा हॉटेल सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये अन्यथा आम्ही तुझा तुझ्या पतीचा विवाह दुसर्या मुलीशी करून देऊ असे म्हणून त्यांना मारहाण करणे, मानसिक त्रास देणे सुरू केले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी व नातेवाईकांनी पती व सासरच्या मंडळींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यावरुन ६ डिसेंबर रोजी मालेगाव पोलिस स्टेशनला दिली.
फिर्यादीवरून पती आशिक अली शहा मन्सूर अली शहा, दिर फिरोजशहा असिफ शहा, पुतण्या मोहीन शहा असिफ शहा, पुतण्या मो. मोबान शहा आसिफ शहा, नाईद अख्तर समज शहा तसेच सासू व जेठाणी असे एकूण सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.