सावर येथील शेतकऱ्यांना 84 लाख रुपयांचा गंडा

मका लागवड भोवली : कन्सल्टंट कंपनीच्या कर्मचारयाच प्रताप

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
farmers-scammed : पारंपरिक कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे अपेक्षित उत्पादन येत नसल्याने शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात आहेत. यातूनच बाभुळगाव तालुक्यातील सावर येथील शेतकèयांनी आयुषी अ‍ॅग्रोटेक कंपनी हैदराबाद यांच्याशी संपर्क करून निर्देशाप्रमाणे मका लागवड केली. मात्र, अपेक्षित उत्पादन झाले नाही. कंपनीने 70 हजार रुपये एकराप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचा करार केला.
 
 
kl
 
सावर येथील 120 एकर क्षेत्रातील मक्याच्या नुकसानीचे जवळपास 84 लाख रुपये स्थानिक कंपनी कर्मचाèयांनी दिलेच नाहीत. संतोष वसंत ठाकरेसह सावर येथील शेतकèयांनी मिळून 120 एकरमध्ये मक्याची लागवड केली. या मका उत्पादनाची देखरेख करण्यासाठी कंपनीने शिवप्रसाद दत्तात्रय तिखे यांची कर्मचारी म्हणून नियुक्ती केली. सीइस मका उत्पादन चांगले असून त्यातून भरपूर नफा मिळतो, असे शेतकèयांना सांगण्यात आले. शिवप्रसाद तिखे याला लागवड करून घेण्याकरिता व देखरेखीकरिता 30 हजार रुपये महिन्याने कामावर ठेवले होते.
 
 
शेतकèयांना उत्पादन न झाल्यास 70 हजार रुपये एकराप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल, असेही सांगितले. तिखे यांच्या सांगण्यावरून संतोष ठाकरेसह सावर येथील शेतकèयाने मक्याचे सीड्स प्लॉट लावले. त्यावर मोठा खर्चही केला. मात्र, हा खर्च कंपनीकडून मिळाला नाही, उत्पादनात घट आली. त्यामुळे शेतकèयांनी आयुषी अ‍ॅग्रोटेक कंपनी हैदराबाद यांच्याशी संपर्क केला असता शेतकèयांना नुकसानीची रक्कम शिवप्रसाद तिखे याच्याकडे दिल्याचे सांगितले.
 
 
कंपनीकडून शिवप्रसाद याला पैसे पाठविल्याचे बँक स्टेटमेंटही पुराव्यादाखल शेतकèयांना दिले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष ठाकरे यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शिवप्रसाद दत्तात्रय तिखे (रा. पार्टी तिखे, ता. मालेगाव जि. वाशिम) याच्याविरोधात कलम 318 (4) भारतीय न्याय संहितेनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ठाणेदार सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार मानकर या गुन्ह्याचा तपास करीत आहे.