चिमुकल्यांनी शाळेत पिकविलेला भाजीपाला बाजारात

शेकापूर (बाई) जि. प. प्राथमिक शाळेचा कौतुकास्पद उपक्रम

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट,
Shikapur primary school vegetable garden तालुयातील शेकापूर (बाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेंद्रिय पद्धतीने उभारलेली परसबाग ही केवळ भाजीपाला उत्पादनाची बाग राहिली नाही. तर, विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण देणारी प्रयोगशाळा बनली आहे. या शाळेच्या परसबागेतील भाजीपाला आता थेट बाजारपेठेत विक्रीकरिता नेण्याला सुरूवात झाली आहे.
 

Shikapur primary school vegetable garden 
या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि हिंगणघाट येथील अभिनव विचारमंचच्या एकत्रित प्रयत्नांतून या परसबागेला यंदाच्या स्पर्धेत तालुयात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या परसबागेत उगवलेला भाजीपाला संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार होतो. मुलांना रोजच्या मध्यान्ह भोजनात पौष्टिक आहार म्हणून दिला जातो. त्यामुळे मुलांमध्ये आरोग्य, निसर्गप्रेम, शेतीचे मूलभूत ज्ञान आणि स्वच्छतेची सवय अशा अनेक मूल्यांचा सुंदर संगम घडत आहे. गुरुवार ४ रोजी शेकापूरचा आठवडी बाजार भरतो. ही संधी ओळखून शिक्षिका दीपाली सावंत यांनी काही विद्यार्थ्यांना सोबत घेत बाजारात भेट दिली आणि मुलांना प्रत्यक्ष भाजीपाला विक्रीचा अनुभव दिला. त्यांनी स्वतः तयार केलेला व कापलेला भाजीपाला बाजारातील ग्राहकांना विकला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार, तोल-मापन, ग्राहकांशी संवाद, उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आणि मेहनतीचे महत्त्व यांचा अनुभव मिळाला.
 
 
 
या उपक्रमासाठी Shikapur primary school vegetable garden  मुख्याध्यापक परमेश्वर नरवटे यांचे नियोजन, शिक्षिका दीपाली सावंत यांची मेहनत, शिक्षक रामकृष्ण ढबाले यांचे सहकार्य, स्वयंपाकी मीरा भोयर यांची मदत आणि राजेंद्र खेकारे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. पालक, शाळा समिती, गावातील शेतकरी आणि अभिनव विचारमंचच्या सहकार्यामुळे ही परसबाग दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहे. प्रत्यक्ष कामातून ज्ञान मिळवण्याची संधी परसबागेमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी नाते जोडण्याची, स्वतःची जबाबदारी शिकण्याची, स्वावलंबी होण्याची, आर्थिक विवेक वाढवण्याची आणि प्रत्यक्ष कामातून ज्ञान मिळवण्याची संधी मिळत आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकापुरते न राहता हाताळणी, अनुभव, प्रयोग आणि प्रत्यक्ष कृतीतून दिले पाहिजे, याचा आदर्श शेकापूर शाळेने घालून दिला आहे.
 
 
चर्चेचा, कौतुकाचा ठरतोय विषय
 
शेकापूर शाळेची ही Shikapur primary school vegetable garden परसबाग आणि विद्यार्थ्यांची भाजीविक्री हा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. इतर शाळांसाठी प्रेरणादायी मॉडेल म्हणून हे उदाहरण पुढे येत आहे. विद्यार्थी आनंदाने, उत्साहाने आणि आत्मविश्वासाने शिकत आहेत, हेच या उपक्रमाचे सर्वांत मोठे यश असल्याचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सांगितले.