‘तेरे इश्क में’चा बॉक्स ऑफिसवर दमदार जलवा

धनुष-कृतिची जोडी प्रेक्षकांच्या मनावर

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
मुंबई,
tere ishq mein box office आनंद एल. राय दिग्दर्शित ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. धनुष आणि कृति सेनन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने 28 नोव्हेंबरला रिलीज होताच चांगली कमाई करण्यास सुरुवात केली. सकारात्मक वर्ड ऑफ माऊथमुळेही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे.शनिवारीदेखील चित्रपटाच्या कमाईत वाढ नोंदवली गेली. ‘धुरंधर’सारख्या ताज्या रिलीजचा तेरे इश्क में*वर काही विशेष परिणाम दिसून आला नाही. Sacnilk च्या अंदाजानुसार, चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी ५.५० कोटी रुपये कमावले. नवव्या दिवसाचे अधिकृत आकडे हाती आले नसले तरी हाच अंदाज कायम राहिला, तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन ९२.९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समजते. येत्या काही दिवसांत कलेक्शनची ही गती कायम राहिल्यास चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये लवकरच प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे.
 

tere ishq mein box office 
या कमाईमुळे तेरे इश्क मे हा धनुषच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी त्यांच्या ‘रांझणा’ने ६०.२२ कोटी, ‘कॅप्टन मिलर’ने ३.१४ कोटी, ‘कुबेरा’ने २.१७ कोटी आणि ‘रायन’ने १.७४ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे धनुषसाठी हा चित्रपट महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
कृति सेननसाठीही हा चित्रपट tere ishq mein box office विशेष ठरत असून तिच्या कारकिर्दीतील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट तिच्या ‘लुका छुपी’च्या ९४.०९ कोटींच्या कलेक्शनलाही मागे टाकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी तेरी बातों में ऐसा उलझा जिया (८५.१६ कोटी), क्रू (८१.९५ कोटी), भेडिया (६८.६७ कोटी) आणि हिरोपंती (५२.७ कोटी) या चित्रपटांना तेरे इश्क मेंने मागे टाकले आहे. सध्या कृतिच्या टॉप कमाईच्या यादीत हाऊसफुल ४ (२१०.३ कोटी), दिलवाले (१४८.४२ कोटी) आणि आदिपुरुष (१४७.९२ कोटी) हे चित्रपट पहिल्या तीन स्थानांवर आहेत.चित्रपटात धनुष आणि कृति सेनन यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावते आहे. कथानकाची मांडणी, संगीत आणि अभिनेत्यांची दमदार कामगिरी यांमुळे तेरे इश्क में प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून बॉक्स ऑफिसवरही त्याचा फायदा मिळत आहे. चित्रपटाची सध्या सुरू असलेली कमाई पाहता, तो लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास व्यापार तज्ञांनी व्यक्त केला आहे.