डान्स फ्लोअरला आग, जीव वाचवायला किचनमध्ये, पण तिथेच थांबला श्वास; VIDEO

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
पणजी, 
goa-nightclub-fire नॉर्थ गोव्यातील एक आनंदी वीकेंड पार्टी नाइट काही क्षणांतच अमंगल ठरली. अर्पोरातील एका नाइट क्लबमध्ये शनिवारी उशिरा भीषण आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य किचन स्टाफ व पर्यटकांचा समावेश असून तीन महिला देखील आहेत.
 
goa-nightclub-fire
 
या दुर्घटनेनंतर उघड झालेले तपशील आणखी धक्कादायक आहेत. स्थानिक प्रशासनाच्या चौकशीत समोर आले आहे की ज्या नाइट क्लबमध्ये हा अपघात झाला, त्याला कोणतीही बांधकाम परवानगी नव्हती. अर्पोरा पंचायतीच्या अधिकाऱ्यांनीही ही माहिती निश्चित केली असून यामुळे गोव्याच्या पर्यटन पट्ट्यातील सुरक्षाव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे. घटनेच्या वेळी क्लबमध्ये उपस्थित असलेल्या काही पर्यटकांनी दिलेली माहिती हादरवून टाकणारी आहे. दिल्लीतील अविनाश यांनी सांगितले की, "आमचा कॅब ड्रायव्हर उशिरा आला आणि त्यामुळे आम्ही थोडक्यात वाचलो. goa-nightclub-fire वेळेत पोचलो असतो तर आम्हीही त्या ठिकाणीच असतो." जवळील रेस्टॉरंटमधील सुरक्षा रक्षकाने मोठा स्फोट झाल्याचे सांगत, त्यानंतर गॅस सिलेंडर फुटल्याने आग भडकली असल्याचे नमूद केले. दिल्लीहून आलेल्या निखनेश यांनीही सांगितले की, ते पोहोचताच धूर उठू लागला आणि संपूर्ण परिसर गोंधळात सापडला. "आम्हीचही त्याच रात्री पार्टीसाठी जाण्याचा विचार करत होतो," असे तो म्हणाला. पर्यटकांच्या मते, आग लागली तेव्हा डान्स फ्लोअरवर किमान १०० ते १५० लोक होते. भीतीपोटी अनेकजण खालील किचन भागाकडे धावले; पण तेथे मार्ग बंद असल्याने पर्यटकांसह स्टाफचे अनेक सदस्य आतच अडकले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बहुसंख्य किचन कर्मचारी होते.
सौजन्य : सोशल मीडिया 
या भीषण दुर्घटनेला क्लबमधील असुरक्षित सजावटीनेही चिथावणी दिली. नारळाच्या पानांनी बनवलेली तात्पुरती सजावट काही क्षणांत धगधगू लागली. संकुचित गल्ल्या आणि क्लबचे बॅकवॉटरच्या जवळ असलेले लोकेशन यामुळे फायर ब्रिगेडला जागेपासून जवळपास ४०० मीटर अंतरावरच थांबावे लागले. goa-nightclub-fire त्यामुळे बचावकार्याला मोठा विलंब झाला आणि परिस्थिती अधिक गंभीर बनली. फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांनीही हे मान्य केले की पोहोचण्यातील अडथळ्यांमुळे हानी अधिक वाढली. नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात घडलेली ही घटना पुन्हा एकदा सुरक्षेची निकड आणि पर्यटकांच्या जीवितासंदर्भातील प्रश्न अधोरेखित करून जाते.