वर्धा,
leprosy-patient : जिल्ह्यात १७ नोव्हेंबरपासून कुष्ठ रुग्ण शोध मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत १३.५७ लाख व्यतींची तपासणी करण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यात तब्बल १६३ नवीन कुष्ठरुग्ण सापडले आहेत. या सर्व रुग्णांना उपचाराखाली आणण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेतील कुष्ठरोग विभागाच्यावतीने १७ नोव्हेंबरपासून कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार ४६४ घरांना भेटी देत १४ लाख ८२ हजार नागरिकांची तपासणी करण्याचे सुरूवातीला निश्चित करण्यात आले. सुक्ष्म नियोजनानंतर प्रत्यक्षात कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत गृहभेटी देत १३.५४ लाख व्यतींची तपासणी करण्यात आली. याच तपासणीत तब्बल १६३ नवीन कुष्ठरुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. या नवीन कुष्ठ रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील १४७ तर शहरी भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. वेळीच ट्रेस करण्यात आलेल्या या सर्व रुग्णांना उपचाराखाली आणण्यात आले आहे.
कुष्ठरोग शोध अभियानामध्ये १३ लाख ५७ हजार ७२६ व्यतींची तपासणी केली गेली आहे. या तपासणी दरम्यान जिल्ह्यात १६३ नवीन कुष्ठरुग्ण आढळले असून, त्यापैकी १४७ रुग्ण ग्रामीण भागात तर १६ रुग्ण शहरी भागात आढळले. हे रुग्ण इतर रुग्णांपासून वेगळे करणे, त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करणे आणि त्यांना योग्य आरोग्य सेवांचा लाभ दिला जात आहे.
नागरिकांचाही अभियानाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद
कुष्ठरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. आरोग्य यंत्रणेची चमू कुणाच्या घरी पोहोचल्यावर त्या कुटुंबाकडून स्वत: पुढाकार घेऊन तपासणी करून घेतली जात आहे. एकूणच कुष्ठरोग मुत जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिक या अभियानाला स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.