वर्धा,
rabi-crop-cultivation : खरीप हंगामात अतिवृष्टी आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान सहन कराव्या लागणार्या शेतकर्यांनी यंदा मोठे धाडस करीत रबी हंगामाची तयारी केली. जिल्ह्यात आतापर्यंत रबी पिकांची ६८.९५ टक्के लागवड झाली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्यांनी यंदा हरभरा लागवडीवरच जादा भर दिल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

जिल्ह्यात रबी पिकांची लागवड १ लाख १४ हजार ७६४.२१ हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. आतापर्यंत ७९ हजार १२८.२७ हेटर जमिनीवर विविध रबी पिकांची लागवड झाली आहे. लागवड करण्यात आलेले हरभरा पीक काही ठिकाणी उगवण तर काही ठिकाणी रोपावस्थेत आहे. गहू पिकांचीही अशीच परिस्थिती आहे. पिकातील तण निर्मुलनावर शेतकरी लक्ष केंद्रीत करीत आहे. यंदा खरीपात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिली. नंतर वेळावेळी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीच्या संकटातून बचावलेल्या सोयाबीन पिकावर ऐन दिवाळीच्या तोंडावर चारकोल रॉट व यलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. साधा कापणी व मळणीचा खर्चही निघणार नाही हे लक्षात आल्यावर शेतकर्यांनी सोयाबीन पिकात जनावरे सोडली. तर काही ठिकाणी पिकावर रोटाव्हेटर फिरविण्यात आले. काही ठिकाणी शेतकर्यांनी सोयाबीन पिकाच्या गंजीलाच आगीच्या हवाली केले. अशाही परिस्थितीत सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्यांनी मोठे धाडस करीत रबी पिकांची लागवड केली आहे. खरीप गेला रबी दगा देणार नाही, अशी आशा शेतकर्यांना आहे.
गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ४० हजार ६६९.२९ हेटर असून १७ हजार ९०६.७० हेटरवर पेरणी करण्यात आली आहे. हरभर्याचे सरासरी क्षेत्र ७२ हजार १०२.४३ हेटर असून ६० हजार ६७१ हेटरवर पेरणी तर ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ हजार २९१.६६ हेटर असून २९०.