एअर इंडियाचा मोठा निर्णय! री-शेड्युलिंग व कॅन्सिलेशनवर शून्य शुल्क

तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
air-india-ticket-rules इंडिगोच्या उड्डाणांमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या अडचणींमुळे देशभरातील प्रवाशांचे हाल सुरूच असताना, टाटा समूहाच्या एअर इंडियाने प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. इंडिगोच्या तांत्रिक आणि ऑपरेशनल गोंधळामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले होते, तिकिटांचे दर प्रचंड वाढले होते आणि प्रवासाचे सर्व नियोजन विस्कटले होते. अशा वेळी एअर इंडियाने प्रवाशांना मोठा दिलासा देत तिकिटांचे री-शेड्युलिंग आणि रद्दीकरण पूर्णपणे मोफत करण्याची घोषणा केली असून, रद्दीकरणावर फुल रिफंड देण्याचेही स्पष्ट केले आहे.

air-india-ticket-rules 
 
इंडिगो संकटामुळे संपूर्ण एव्हिएशन क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. एअर इंडियाने सांगितले की, कंपनी आणि तिची सबसिडियरी एअर इंडिया एक्सप्रेस यांनी 4 डिसेंबरपासून सर्व नॉन-स्टॉप देशांतर्गत उड्डाणांचे इकॉनॉमी वर्गातील तिकीट दर कॅप केले आहेत. air-india-ticket-rules म्हणजेच अचानक वाढणाऱ्या डिमांड-सप्लाय प्राइसिंगचा परिणाम प्रवाशांवर होणार नाही. नागरिक उड्डयन मंत्रालयानेही स्पष्ट केले होते की, जादा दर आकारणी सहन केली जाणार नाही आणि एअरलाइनांनी नवीन फेअर कॅप नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
एअर इंडियाने 4 डिसेंबरपर्यंत तिकीट बुक केलेल्या आणि 15 डिसेंबर 2025 पर्यंत प्रवासाचे नियोजन असलेल्या प्रवाशांसाठी वन-टाइम स्पेशल वेव्हर लागू केला आहे. या प्रवाशांना आता त्यांचा प्रवास कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना पुढे ढकलता येणार आहे. तिकीट पूर्णपणे रद्द करण्याची गरज भासल्यास कोणताही कॅन्सिलेशन चार्ज आकारला जाणार नाही आणि 100% रिफंड मिळणार आहे. air-india-ticket-rules ही सवलत 8 डिसेंबर 2025 पर्यंत री-शेड्युल किंवा कॅन्सिल केलेल्या तिकिटांवर लागू राहील. मात्र, नव्या तारखेसाठी भाड्यात फरक असल्यास तो प्रवाशाने भरावा लागेल. एअर इंडियाचा हा निर्णय इंडिगो संकटात अडकलेल्या लाखो प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.