जयपूर,
7-storey-hotel-built-in-5-months जयपूरमधील मालवीय नगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलची इमारत एका बाजूला झुकल्याने अचानक गोंधळ उडाला. इमारत कोसळण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. रहिवाशांनी तक्रार केली. प्रशासनाने वेळीच कारवाई केली आणि मोठा अनर्थ टळला.
प्रशासनाला इमारत झुकल्याची माहिती मिळताच, एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाने इमारतीभोवतीचा २०० मीटरचा परिसर सील केला. पोलिसांनी तात्काळ क्रेन बोलावून इमारतीला आधार दिला. 7-storey-hotel-built-in-5-months तपासातून धक्कादायक खुलासा झाला की हॉटेल कोणत्याही परवानग्याशिवाय बांधले जात होते. हॉटेलच्या शेजारी तळघर खोदत असताना ही दुर्घटना घडली. हॉटेलचे काम इतक्या वेगाने सुरू होते की अवघ्या सात महिन्यांत पाच मजले पूर्ण झाले, असे वृत्त आहे. तक्रार मिळाल्यानंतर, पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव आणि मदत कार्य सुरू केले. पथकाने प्रथम दोन क्रेनने इमारतीला आधार दिला. त्यानंतर, त्यांनी इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती सुरक्षितपणे खाली पाडण्यात आली, मोठी दुर्घटना टळली.