सत्ताधाऱ्यांच्या एका गटातील 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला

aaditya thackeray-nagpur आदित्य ठाकरे यांचा दावा

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
 
aaditya thackeray-nagpur विधानसभा आणि विधानपरिषद दाेन्ही मध्ये विराेधी पक्षनेते नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे हा प्रश्नच आहे. सरकारमध्येच दाेन विराेधी पक्षनेते तयार हाेत आहेत का ही ती भीती असावी. पण सत्ताधाèयांच्या एका गटातून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर ते नाचत आहेत असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी केला.
 
 
 
 
aaditya-thackeray-nagpur
 
 
 
aaditya thackeray-nagpur हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. विराेधी पक्षनेतेपदाच्या प्रस्तावामध्ये बदल झाल्याची अफवा पसरविली जात असून ती काेण पसरवित आहेत याचीही आम्हाला माहिती असल्याचे ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे इंडिगाे विमानाने येत नाहीत या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका इंडिगाेमुळे सामान्य प्रवाशांना झालेल्या त्रासाची थट्टा उडविण्यासाठी हाेती की त्या मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी, याचा विचार करायला हवा. रविवारी मुख्यमंत्री स्वतः चार्टर विमानाने आले. त्यांचे विमान दाेन वेळा मुंबईला गेले.
 
 
 
aaditya thackeray-nagpur दाेन्ही उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे आमदार चार्टर विमानाने आलेत. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचारासाठी हेलिकाॅप्टरने फिरलेत. एका उपमुख्यमंत्र्यांच्या गावी जायला रस्ता नाही पण तिथे हेलिकाॅप्टर जाताे. आत्ताच्या निवडणुकांमध्ये हेलिकाॅप्टरने बॅगा भरून कुठला आनंदाचा शिधा वाटत हाेते याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. 2014 पूर्वी वेगवेगळ्या विमान कंपन्या कार्यरत हाेत्या. पण त्या हळूहळू संपविण्यात आल्याने आता एका कंपनीची मक्तेदारी झाली आहे. केंद्र सरकारचेदेखील ही कंपनी ऐकत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.