सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा मोठा आधार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Armed Forces Flag Day Fund, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री अ‍ॅड््. आशीष जयस्वाल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, सामान्य प्रशासन सचिव पंकज कुमार, माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल मनोहर ठोंगे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, सीईओ विनायक महामुनी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सैनिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी शासनाच्यातर्फे 25 लाख रुपये देण्यात येत होते. ते चौपट वाढवून एक कोटी रुपये करण्यात आले. नागरिकांनी आपापल्या परीने सहभाग देऊन सेनेप्रति आपला भाव व्यक्त करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
 

Armed Forces Flag Day Fund, 
नागपूर जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अन्य विभाग प्रमुखांचा सन्मान करण्यात आला.माजी सैनिकाच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले. संजयकुमार केवटे, मेजर पंढरी चव्हाण यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
 
फुल विक्रेते Armed Forces Flag Day Fund  आशीष व संतोष गडीकर यांनी त्यांच्या रोजच्या मिळकतीमधून प्रति महिना 500 रुपये ध्वज दिन निधी संकलनात दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याव्यतिरिक्त 1965 व 1971 च्या युद्धातील सैनिक मेजर हेमंत जकाते यांनी 2025 च्या निधी संकलनात 50 हजार व गीता कोठे यांनी एक लाख रुपये ध्वजदिन निधी दिल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
 
 
नागपूर जिल्हा अव्वल
सन 2024 मध्ये नागपूर जिल्ह्याला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी दोन कोटी 15 लाख रुपये उद्दिष्ट मिळाले होते. नागपूर जिल्ह्याने निधी संकलनात राज्यात भरीव कामगिरी करीत तीन कोटी 51 लाख 71 हजार म्हणजेच 164 टक्के निधीचे संकलन केले. 2025 मध्ये जिल्ह्याला दोन कोटी 15 लाख रुपये उद्दिष्ट मिळाले आहे.