मुंबई,
Five IndiGo flights cancelled मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील T1 टर्मिनलवरून प्रवास करणाऱ्या इंडिगो प्रवाशांसाठी आज सकाळी दिलासा देणारा अपडेट जारी करण्यात आला. ८ डिसेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजेपर्यंत पाच देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली असली तरी, एकूण फ्लाइट ऑपरेशन कालच्या तुलनेत अधिक सुरळीत असून बहुतेक उड्डाणे वेळेवर धावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणाऱ्या विलंब आणि रद्दीकरणांमुळे निर्माण झालेली गैरसोय आज काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. सकाळी उपलब्ध माहितीनुसार, मुंबईहून गोवा, दरभंगा, हैदराबाद, कोलकाता आणि भुवनेश्वर या मार्गांवरील पाच उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तथापि, याशिवाय इतर प्रमुख देशांतर्गत मार्गांवरील उड्डाणे वेळेवर सुरू आहेत. मुंबई–दिल्ली, पाटणा, कोची, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, जबलपूर, प्रयागराज, कानपूर, गोरखपूर, कन्नूर, कोइम्बतूर आणि कालिकत या मार्गांवर फ्लाइट ऑपरेशन नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे.

हैदराबाद मार्गावर एक फ्लाइट रद्द करण्यात आली असल्याने या मार्गावरील प्रवाशांनी फ्लाइट स्टेटस पुन्हा तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, इंडिगोची आंतरराष्ट्रीय उड्डाणेही जवळपास वेळेवर धावत असून चेक-इन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी रविवारी सांगितले की इंडिगो हळूहळू सामान्य स्थितीकडे परतत असून रविवारच्या दिवशी कंपनी सुमारे १,६५० उड्डाणे चालवणार आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द व विलंब झाल्याने हजारो प्रवाशांची अडचण झाली होती; मात्र शनिवारी १,५०० आणि शुक्रवारी ७०० हून अधिक उड्डाणे पार पडल्याने परिस्थिती सुधारू लागल्याचे संकेत मिलत आहेत.