पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जि.प.ची मदत

27 लाख 51 हजारांचा धनादेश,मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Flood relief fund, अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागपूर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाèयांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 27 लक्ष 51 हजार रू. धनादेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी रामगिरी निवासस्थानी आज दिला. उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
 

Flood relief fund, 
पूरग्रस्तांच्या विशेषत: मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्तांच्या मदतीसाठी नागपूर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाèयांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवित शासनाच्या आवाहनानुसार स्वेच्छेने पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला आहे. हा निधी शासनाने वेतनातून केलेल्या कपातीव्यतिरिक्त आहे.जि.प.तर्फे सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवत मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक सहाय्य स्वेच्छेने गोळा केल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. यापूर्वी दिवाळीनिमित्त गरजूंना कपडे व इतर साहित्य देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हास्तरावर एक अभियान म्हणून राबविण्यात आले आहे.
या उपक्रमामध्ये Flood relief fund, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प संचालक विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंशुजा गराटे, मुख्य वित्त व लेखाधिकारी कुमुदिनी हाडोळे, कपील कलोडे, डॉ. कैलास घोडके, कल्पना इखार, डॉ. राजेंद्र गहलोद, डॉ. फुके, निखिल भुयार आदी अधिकारी व विभाग प्रमुखांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला.