सोलापूर,
Foot worship stopped in Pandharpur पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भाविकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. मंदिर समितीने २१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विठ्ठल-रुक्मिणी मातेची पाद्यपूजा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या आणि कोट्यावधी वारकऱ्यांचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरला ‘दक्षिण काशी’ असेही संबोधले जाते. नाताळ आणि वर्षाच्या शेवटी वाढणाऱ्या पर्यटनामुळे भाविकांची गर्दी प्रचंड वाढते.
दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने पाद्यपूजा काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाद्यपूजेच्या माध्यमातून भक्तांना थेट देवाच्या चरणांची पूजा करण्याची संधी मिळते. तथापि, गर्दीचा ताण लक्षात घेऊन सलग अकरा दिवस पाद्यपूजा बंद राहणार आहे. या पूजेसाठी इच्छुक भाविकांनी पाच हजार रुपये देणगी शुल्क भरल्यास पाच भाविकांना चरणसेवा करण्याची संधी मिळते.