नागपूर,
The South Public School दि साऊथ पब्लिक स्कूल ओंकार नगर येथे आयोजित आजी-आजोबा मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की “उद्याचे नागरिक घडवणे ही जबाबदारी शाळेसोबतच आजी-आजोबांनीही स्वीकारणे गरजेचे आहे. घरातून मिळणारे संस्कार आणि शाळेतील शिक्षण यांचे सुंदर मिश्रणच राष्ट्राचा विजयध्वज उंचावू शकते.” कार्यक्रमात शाळेचे संचालक देवेन दस्तुरे, प्राचार्या डॉ. मृणालिनी दस्तुरे, दिग्विजय दस्तुरे, मुख्याध्यापक मंगेश चिनेवार, तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता. भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष व प्रसिद्ध वक्ते दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, “आजच्या व्यस्त जीवनशैलीत मुलांवर संस्कार करण्याची महत्त्वाची भूमिका आजी-आजोबांची झाली आहे. तेच मुलांचे भावनिक आधारस्थान आहेत.”

मेळाव्यात आजी-आजोबांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेऊन आपले कौशल्य सादर केले. शाळेतील नातवाच्या आजी व सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आरती पांडे यांचे नृत्य विशेष आकर्षण ठरले. The South Public School तसेच व अजय पहाडे यांच्या विवाह वाढदिवसानिमित्त विशेष विवाहसोहळा आयोजित करण्यात आला, ज्याचा उपस्थितांनी आनंद घेतला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्राचार्या डॉ. मृणालिनी दस्तुरे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनीही आजी-आजोबांसाठी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मृणालिनी दस्तुरे, तर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन स्मिता खंगई आणि शलाका जोशी यांनी केले.
सौजन्य: शिल्पा नंदनपवार, संपर्क मित्र