नागपूर,
Valmik Ambekar श्री अन्नपूर्णा मानव कल्याण सेवा संस्था, पिपळाचे सचिव, श्रीमद्भगवद्गीता अभ्यासक मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य, पंढरपूरचे वारकरी आणि अनेक धार्मिक संस्थांचे मान्यवर सदस्य ह. भ. प. वाल्मीक महाराज आंबेकर यांचा नुकताच ज्येष्ठ नागरिक मंडळ, दत्तात्रय नगरतर्फे सत्कार करण्यात आला. जवाहर सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष नामदेव फटिंग यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि शुभेच्छापत्र देऊन वाल्मीक महाराज यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात बासरीवादक मनोहर धाबेकर यांच्या सुमधुर बासरी वादनाने झाली. त्यानंतर उत्तरा धाबेकर यांनी भक्तिगीत सादर करून वातावरण अधिक भक्तिमय केले. Valmik Ambekar प्रा. महादेव बोराडे यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. सत्कार कार्यक्रमाला गुलाब उमाठे, मोरेश्वर मेघरे, श्रीराम दुरगकर, पद्माकर आगरकर, भीम पाटील, गजानन महाले, गौतम सोमकुवर, एड. विकास आंबेकर, पद्माकर बाविस्कर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: नितीन दुरगकर, संपर्क मित्र