हैदराबाद,
Hyderabad Donald Trump Road तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी हैदराबादमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा निर्णय तेलंगणा रायझिंग ग्लोबल समिट दरम्यान आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्यासाठी घेतल्याचे दिसून येते. मात्र या प्रस्तावावर विरोधकांनी तात्काळ टीका केली आहे.
तेलंगणा भाजपने मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावावर संताप व्यक्त करत त्याला टोमणा मारला आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी या निर्णयावर टीका करत हैदराबादचे नाव पुन्हा “भाग्यनगर” करण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, सरकार ऐतिहासिक अर्थ समजावून काहीतरी करावे, नाहीतर फक्त ट्रेंडिंग नावांनुसार रस्त्यांची नावे बदलण्यात व्यस्त आहे.
हैदराबादमध्ये पूर्वीपासूनच गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि विप्रो सारख्या जागतिक कंपन्यांच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवण्याची परंपरा आहे. यामुळे शहरातील आंतरराष्ट्रीय उपस्थिती दर्शविण्याचा प्रयत्न केला जातो. रेवंत रेड्डी यांचा प्रस्तावही या परंपरेचा भाग म्हणून पाहिला जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले असून, प्रस्तावाला नागरिकांच्या आणि विरोधकांच्या मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.