ऑस्ट्रेलियात पुन्हा जंगलाला भीषण आग

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
पर्थ,
Massive forest fire in Australia ऑस्ट्रेलियात भीषण वणव्यांनी पुन्हा एकदा प्रचंड हाहाकार माजवला असून, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आगीने दोन राज्यांना वेढा घातला असून आतापर्यंत सुमारे ४० घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये एका ५९ वर्षीय अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. न्यू साउथ वेल्समधील बुलाहडेलाह शहराजवळ जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्यावर झाड कोसळले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला वाचवता आले नाही.
 
 

Fires in Australia 
या भागातील ३,५०० हेक्टरपेक्षा अधिक जंगल पूर्णपणे जळून राख झाले आहे. राज्यात सध्या ५२ वणवे पेटले असून त्यापैकी नऊ पूर्णपणे नियंत्रणाबाहेर आहेत. न्यू साउथ वेल्समध्येच आतापर्यंत २० हून अधिक घरे आगीत उद्ध्वस्त झाली आहेत. डॉल्फिन सँड्सच्या किनारी भागातही आगीने थैमान घातले असून १९ घरे जळून गेल्याचे अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. परिसरातील रस्ते बंद करण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाच्या मते, येत्या काही दिवसांतही वणव्यांची तीव्रता कमी होण्याची चिन्हे नाहीत आणि बचाव पथकांना आणखी अनेक दिवस तैनात राहावे लागणार असल्याचे संकेत आहेत.