तीन जिल्ह्यातल्या दुचाकी चोरीचा भांडाफोड

morshi-bike thief-police अट्टल चोराकडून २६ मोटरसायकली जप्त

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
मोर्शी, 
 
morshi-bike thief-police गेल्या काही दिवसांपासून अमरावती, अकोला, वाशीम जिल्ह्यात मोटरसायकल चोरट्याने धुमाकूळ घातला होता. या चोरीचा भंडाफोड पोलिसांनी केला आहे. दररोज विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकली चोरी होत असल्याने ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती स्थानिक गुन्हे प्रगटीकरण शाखेला दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. गुप्त बातमीदारांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वरूड तालुक्यातील मोरचूद येथील लोकेश गजेंद्र भोगे हा युवक मोर्शी येथे भाड्याने राहत होता.
 
 
 
morshi-bike thief-police
 
(मोर्शी पोलिस ठाणे आवारात जमा करण्यात आलेल्या मोटरसायकली) 
 
morshi-bike thief-police लोकेशला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली असता लोकेशने त्याचा साथीदार गौरव सुरेश जामोदकर रा. खेड, ता. मोर्शी याच्या मदतीने अमरावती शहरातील गाडगे नगर पोलिस स्टेशन, सिटी कोतवाली पोलिस स्टेशन, राजापेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून तसेच वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड व अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. दुर्गवाडाचे रहिवासी अक्षय कमलाकर साबळे यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी मोटरसायकल चोरणारा आरोपी लोकेश गजेंद्र भोगे व गौरव सुरेश जामोदकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून २६ मोटरसायकलींसह नऊ लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
 
 
morshi-bike thief-police ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, मोर्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर, प्रभारी ठाणेदार अशोक लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, छत्रपती करपते, स्वप्निल बायस्कर, अथर्व कोहळे यांनी केली आहे.