नगरपरिषदेच्या निकालांमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
मुंबई,
MPSC exam postponed महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. २१ डिसेंबर रोजी होणार होतील अशी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या दिवशी राज्यातील नगरपरिषद निवडणुकींचे निकाल जाहीर होणार असल्यामुळे प्रशासकीय, सुरक्षा आणि परीक्षा व्यवस्थेसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अनेकांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर आयोगाने ती मान्य केली आहे.
 
 

mpsc exam 
नवीन वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे, तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागांत २१ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे लाखो उमेदवारांसाठी आवश्यक परीक्षा व्यवस्था सुरळीत पार पाडणे कठीण होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. उमेदवारांच्या सोयीसाठी आयोगाने हा निर्णय घेतला असून बदललेले वेळापत्रक लवकरच एमपीएससीचीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.