नागपूर,
government industrial training institute मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांचे नाव नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराजांच्या जयंतीदिनी 8 डिसेंबर रोजी हा नामांतर सोहळा होणार आहे. राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांचे नाव देण्याचा निर्णय कौशल्य विभागाने घेतला असून या निर्णयाचे हे पुढचे पाऊल असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
संत जगनाडे महाराजांवर संत तुकारामांचा मोठा प्रभाव होता. मानवतेची शिकवण देणाऱ्या संत तुकारामांच्या गाथेतील समतेचे विचार त्यांनी अभंग रूपाने व्यक्त केले. तसेच संत तुकाराम यांच्या गाथेचा भाग तन्मयतेने शोधून त्यांनी समाजासाठी संपूर्ण गाथा बहाल केली. त्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले.
नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या या नामांतर सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार , एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि पूर्व नागपूर मतदार संघाचे आमदार श्री. कृष्णा खोपडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महापुरुष संत जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करावा अशी ही संकल्पना यावेळी मंत्री लोढा यांनी मांडली आहे.government industrial training institute याच अनुषंगाने नागपूर येथील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, प्राचार्य, प्रादेशिक अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत. संत जगनाडे महाराजांच्या सामाजिक कार्य, समतेचा संदेश विषयी मार्गदर्शनपर माहिती कार्यक्रमादरम्यान दिली जाणार आहे.