आ. कुणावार चौथ्यांदा विधानसभा तालिका अध्यक्ष

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट
Sameer Kunawar, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला आज सोमवार ८ डिसेंबरपासून सुरूवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आ. समीर कुणावार यांची तालिका अध्यक्षपदी निवड केली. आ. कुणावार यांना ही जबाबदारी सलग चौथ्यांदा सोपवण्यात आली आहे.
 

Sameer Kunawar,  
याआधी वर्धेचे तत्कालीन आ. प्रमोद शेंडे यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून विधान मंडळाचे कामकाज करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष हा बहुमान आ. कुणावार यांना मिळाला असून पहिल्यांदा नागपूर अधिवेशनात विदर्भातील नेतृत्व म्हणून त्यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत तालिका अध्यक्ष म्हणून काम करताना सत्रातील जास्तीत जास्त कामकाज त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. तसेच विक्रमी सलग सात तास सभागृहाचे कामकाज चालविण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर असून त्या कामगिरीबद्दल विधानसभा अध्यक्षांनी सभागृहामध्ये आ. कुणावार यांचे कौतुक केले होते. त्याचप्रमाणे उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
आ. समीर कुणावार यांनी, सभागृहाच्या तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज करताना महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या मतदार संघातील न्याय उचित मागण्यांना सभागृहासमोर मांडण्याचे सौभाग्य मिळणार असून निश्चितच दिलेल्या संधीचा सद्उपयोग करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत आ. कुणावार यांनी व्यत केले.
आ. कुणावार यांनी त्यांच्या मतदार संघाचे उत्तम नेतृत्व केल्याने व त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेऊन त्यांना चौथ्यांदा संधी दिल्याचं सांगितलं जात आहे.