tatr-moharli-tadoba-tiger पैशाचा गैरव्यवहार अशक्यच, अद्याप तशी तक्रारही नाही
-‘ताडोबा’चे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ल यांची माहिती
चंद्रपूर,
tatr-moharli-tadoba-tigerताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीबाबत ‘इकोटुरिझम मॅनेजर’ गोविंदा असोपा यांच्या वर्तणुकीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत, तक्रारीत नावे असलेल्या सर्वांना प्रत्यक्ष कार्यालयात बोलवून आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सोमवार, 8 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ती बुधवारपर्यंत चालेल. मात्र, प्राप्त तक्रारी या केवळ वर्तणूक आणि पर्यटनाचे प्रवेशद्वार अचानक बदलाच्या आहेत. आतापर्यंतची कोणतीही तक्रार पैश्याशी संबंधित नाही. नोंदणीसाठी अतिरिक्त पैसे घेणे अशक्य आहे, अशी ठाम भूमिका ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना मांडली.
(ताडोबाचे मोहर्ली द्वार, तर इन्सेटमध्ये प्रभुनाथ शुक्ल)
tatr-moharli-tadoba-tiger तक्रारदारांना 5 डिसेंबर 2025 रोजीच सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, ते उशिरा आल्यामुळे त्यांची निवेदने नोंदवता आली नव्हती. सोमवारी सकाळपासून त्यांचे म्हणणे नोंदवणे सुरू आहे. अनेक जण आजही आले नसल्याने या प्रक्रियेला आणखी दोन दिवस लागतील. दरम्यान, क्षेत्र संचालकांकडे असलेल्या कोट्यांतर्गत पर्यटन प्रवेश परवान्यांच्या वाटपाबाबत विश्वासार्ह नसणार्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या, ज्यात गैरव्यवहाराचाही आरोप केला जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासन या आरोपाचे ठामपणे खंडण करते. शिवाय यापुढे वनविभागाला असे विनाकारण बदनाम करणार्यांविरूध्द कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट मत शुक्ल यांनी व्यक्त केले.
tatr-moharli-tadoba-tiger ‘इकोटुरिझम मॅनेजर’ची भूमिका पर्यटकांना केवळ प्रवेशद्वाराचा तपशील, वेळा आणि आवश्यक तेवढ्या सूचना कळवण्यापुरती मर्यादित आहे. विशेष प्रवेश कोटा वाटपाची जबाबदारी व अधिकार केवळ मुख्यालयाचे विभागीय अधिकारी यांच्याकडे आहे आणि या निर्णय प्रक्रियेत कोणत्याही कंत्राटी कर्मचार्याचा सहभाग नाही, असेही शुक्ल यांनी स्पष्ट केले. वाटप झालेल्या सर्व पर्यटकांनी आरक्षित क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित प्रवेश द्वारावर ‘पेमेंट’ करणे आवश्यक आहे. ज्या प्रवेशद्वारावर ‘इंटरनेट नेटवर्क’ उपलब्ध आहे, तिथे ‘ऑनलाईन पेमेंट’च घेतले जाते. मात्र, ज्या गेटवर ‘कनेक्टिव्हिटी’ नाही तिथेच ‘ऑफलाईन पेमेंट’ स्वीकारले जाते. मात्र, त्याची अधिकृत पावत्या दिली जाते. ‘इंटरनेट नेटवर्क’ समस्या सुटल्यावर सर्वच प्रवेशद्वारावर 100 टक्के ‘ऑनलाईन पेमेंट’ सुनिश्चित केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
tatr-moharli-tadoba-tiger व्यवस्थापन कोट्याद्वारे प्रवेश करणार्या पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्याबाबत किंवा कंत्राटी कर्मचार्यांच्या सहभागाबाबत या कार्यालयाकडे अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, असे शुक्ल यांनी आवर्जून सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वनसंरक्षण व पर्यटक व्यवस्थापनात उत्कृष्ट काम करीत आहे आणि दरवर्षी सुमारे 4 लाख पर्यटक समाधानाने सफरीचा आनंद घेत आहेत, असेही शुक्ल म्हणाले.
‘प्रवेश परवाने वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक’
tatr-moharli-tadoba-tiger क्षेत्र संचालकांचा कोटा प्रवेश परवान्यांच्या वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, त्याची काटेकोरपणे देखरेख केली जाते. निर्णय प्रक्रियेत कंत्राटी ‘इकोटुरिझम मॅनेजर’ला कोणतीही महत्त्वाची भूमिका देण्यात आलेली नाही. सर्व प्रवेशाच्या विनंत्या ‘इकोटुरिझम मॅनेजर’द्वारे फक्त संकलित केल्या जातात आणि ताडोबा मुख्यालयाच्या विभागीय वनाधिकारी यांच्या समोर ठेवल्या जातात. वाटपाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार विभागीय वनाधिकारी यांच्याकडे आहे आणि आवश्यकतेनुसार ते क्षेत्र संचालकांशी सल्लामसलत करतात. अंतिम मंजूर यादी नंतर प्रवेशद्वार व्यवस्थापकांच्या अधिकृत ‘व्हॉट्सअॅप’ गटांद्वारे पाठवली जाते, अशी माहिती प्रभुनाथ शुक्ल यांनी दिली.