चंद्रपूर,
tatr-tourism-online booking ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प एव्हाना जगप्रसिध्द झाले असून, दरवर्षी चार लाखावर पर्यटक येथील देखणा वाघ आणि जैवविविधतेने नटलेल्या जंगलाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळे प्रवेश परवाना मिळणेदेखील जिकरीचे असते. याचाच गैरफायदा घेत काही बनावट ‘वेबसाईट’च्या माध्यमातून पर्यटकांना फसवले गेले असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. प्रभु नाथ शुक्ल यांनी 6 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबर रोजी अशा अनुक्रमे दोन रितसर तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे नोंदविल्या आहेत.
(संग्रहित छायाचित्र)
tatr-tourism-online booking येथील वाघाची एक झलक बघण्यासाठी अनेक पर्यटक कितीही रक्कम मोजण्यासाठी तयार असतात. मात्र, ऑनलाईन बुकींग प्रक्रियेमुळे अनेकांना निराश व्हावे लागते. ही परिस्थिती हेरून काही बनावट वेबसाईटच्या माध्यमातून पर्यटकांना लुबाडण्याचे काम सुरू आहे. तशा तक्रारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यस्थापनाकडे आल्या आहेत.
tatr-tourism-online booking मागील आक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जवळपास 13 पर्यटकांची फसवणूक अशा प्रकारच्या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर रोजी फसवणूक झालेल्या दहा पर्यटकांची आणि त्यांना फसवणार्या बनावट वेबसाईटची नावे नोंदवून ताडोबा व्यवस्थापनाकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी पुन्हा दुसरी तक्रार दिली गेली असून, त्यात 3 पर्यटकांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. याही तक्रारीत बनावट वेबसाईट्सची नावे दिली आहे.
tatr-tourism-online booking या बनावट वेबसाईट चालविणार्याविरूद्ध सायबर कायद्यांतर्गत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात घडत असलेल्या अशा प्रकारामुळे पर्यटकांची दिशाभूल होत असून, वनविभागाची प्रतिमाही मलिन होत असल्याचे म्हटले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारीसोबत व्हॉट्सप संदेश, बुकींग व्हाउचर्स, पेमेंट स्क्रीनशॉट व आवश्यक पुरावेही देण्यात आले आहेत. यासंदर्भात पोलिस विभागाकडून कसून चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
अशा प्रकाराने प्रकल्पाची बदनामी होतेः डॉ. प्रभू नाथ शुक्ल
tatr-tourism-online booking ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नावाचा गैरवापर करून जंगल सफारी नोंदणी परवान्यासाठी बनावट वेबसाईटद्वारे पर्यटकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. पर्यटकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पुराव्यांच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दोनदा तक्रार करण्यात आल्या असून, पोलिस विभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अशा प्रकारामुळे कारण नसताना ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची बदनामी होते, असे मत क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी तभाशी बोलताना व्यक्त केले.