वर्धा,
wardha-selu-leopard सेलू येथे आज सोमवारी संध्याकाळी एक गंभीर प्रकरण उघडकीस आले. बिबट्याची कातडी विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने केली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन पुरुष आणि एक महिला असे तिघे सेलू शहर परिसरात कोणत्यातरी वन्यप्राण्याची कातडी विकण्याचा प्रयत्न करित होते. याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तिघांना संध्याकाळी ताब्यात घेतले.
(संग्रहित छायाचित्र)
wardha-selu-leopard तपासणीदरम्यान त्यांच्या जवळ बिबट्याची कातडी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून ती कातडी जप्त करण्यात आली. आरोपींपैकी एक पुरुष नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील रहिवासी असून दुसरा बोरगाव नांदोरा येथील तर महिला ही खरांगणा मोरांगना येथील रहिवासी असल्याचे समजते. चौकशीत प्राथमिक माहिती मिळाली की ही कातडी सुमारे महिनाभरापूर्वी हिंगणा परिसरात एका बिबट्याची शिकार करून आणली होती. ही कारवाई उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मीनल तुरखडे व त्यांच्या पथकाने केली.