नागपूर,
winter session-nagpur महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या 'हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके'चे प्रकाशन आज माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर येथे अधिवेशनाकरिता येणाऱ्या राजकीय प्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार व नागरिकांना संबंधित शासकीय यंत्रणेशी सुलभ आणि त्वरित संपर्क साधता यावा, या उद्देशाने ही विस्तृत मार्गदर्शिका तयार करण्यात आली असून संबंधितांना ही उपयुक्त ठरेल असे ब्रिजेश सिंह यांनी याप्रसंगी सांगितले.
winter session-nagpur यावेळी मान्यवरांच्या हस्ते या दूरध्वनी पुस्तिकेच्या क्यू आर कोड चेही प्रकाशन करण्यात आले. या क्यू आर कोडमुळे संपूर्ण दूरध्वनी पुस्तिका आता डिजिटल स्वरूपात सहजपणे ऑनलाईन उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे पुस्तिका छापाईसाठी लागणाऱ्या शासनाच्या निधीतही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. अधिवेशनाच्या काळात सुलभ समन्वयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी ही दूरध्वनी पुस्तिका दोन भागांत विभागली आहे.
winter session-nagpur भाग-1 (राजकीय व व्यवस्थेशी संबंधित): यात प्रामुख्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सदस्य, विधानमंडळाचे प्रमुख (अध्यक्ष, सभापती) यांची कार्यालये व निवासस्थाने यांचे संपर्क क्रमांक समाविष्ट आहेत. तसेच, विधान भवन, हैदराबाद हाऊस, रवी भवन आणि नाग भवन येथील तात्पुरत्या निवास व कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. यासह, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क आणि नागपूर शहर परिसरातील वैद्यकीय सुविधा, पर्यटन स्थळे व परिवहन (रेल्वे, विमान वाहतूक) संबंधी माहितीही उपलब्ध आहे.
winter session-nagpur भाग-2 (शासकीय कार्यालये): यात नागपूरमधील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, न्याय व्यवस्था आणि विविध प्रशासकीय विभाग (सार्वजनिक बांधकाम, वित्त, जलसंपदा) व स्थानिक स्वराज्य संस्था (मनपा/एनआयटी) यांच्या कार्यालये व अधिकाऱ्यांचे विस्तृत संपर्क क्रमांक समाविष्ट आहेत. पुस्तिका प्रकाशन सोहळ्याला सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.