केसरकरांकडे शेती, भूखंड, एक किलो सोने, 1.1 किलो चांदीसह सव्वाकोटींची मालमत्ता

एसीबीने घेतली पुण्यातील घराची झडती

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
गोंदिया, 
ACB : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सदाशिव केसकर (53) यांनी एका खाजगी इसमामार्फत 70 हजार रुपयाची लाच स्विकारली होती. यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या पुणे येथील घर झडती घेतली. झडतीत 1 किलोग्रॅम सोने, 1.1 किलोग्रॅम चांदी, जवळपास 10 लाख रुपये रोख, शेती, भूखंडाचे कागदपत्र अशी तब्बल सव्वाचार कोटी रुपयाची मालमत्ता मिळून आली.
 
 
 
JK
 
 
 
येथील प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर व शहरातील रामनगर येथील राजेश माहेश्वरी या खाजगी इसमामार्फत पर प्रातांतून आणलेल्या जेसीबी यंत्राची नोंदणी करण्यासाठी 70 हजार रुपयाची लाच मागीली होती. नागपूर येथील लाच लुचतप प्रतिबंधक विभागाने 4 डिसेंबर रोजी सापळा कारवाई केली होती. कारवाईत खाजगी इसम राजेश माहेश्वरीच्या माध्यमातून 70 हजार रुपयाची लाच प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर केसरकरांसह आरोपी माहेश्वरीला न्यायालयाने 5 डिसेंबर रोजी जामिन दिला. दरम्यान केसरकरांच्या पुणे येथील घराची एसीबीच्या पथकाने झडती घेतली असता 1 किलोग्रॅम सोने, 1100 किलोग्रॅम चांदी, 22 एकर शेती व 3 भूखंडाचे पेपर्स व जवळपास 10 लाख रोख अशी 4.25 कोटीची स्थावर व जंगम मालमत्ता मिळून आली.