वर्धा,
sandeep-kavishwar : आपले डोके काही बाबतीत केंद्रीत करून ते आपल्याला पटवून देण्यात आले आहे. त्याला कोलोनिअल माईंण्ड सेट असे म्हटल्या जाते. त्याला इतिहास कारणीभूत असुन मॅकेले शिक्षणपद्धतीने आम्ही त्याच चष्म्यातून बघतो आहोत. हे सर्व दुराग्रह बदलविण्यासाठी तो चष्मा काढावा लागणार आहे. आपण धर्माची व्याख्याच बदलून टाकली आहे. धर्म म्हणजे कर्तव्य असल्याचे मार्गदर्शन आंतर राष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास केंद्र नवी दिल्ली येथील अखिल भारतीय संयोजक संदीप कविश्वर यांनी केले.
स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे रविवार ७ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्धा जिल्ह्याच्या वतीने प्रमुख जन संगोष्टी कार्यक्रमात ‘हमारी राष्ट्रीयता’ आणि ‘पंचपरिवर्तन से समाज परिवर्तन’ या दोन विषयावर ते बोलत होते. व्यासपिठावर जिल्हा संघ चालक जेठानंद राजपूत, वर्धा नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख, कार्यक्रमाचे संयोजक धर्मेंद्र मुंधडा उपस्थित होते.
कविश्वर पुढे म्हणाले की, आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. पण, राष्ट्रीयत्वाची चळवळ खुप आधीपासुन सुरू झाली होती. सन १८०५ च्या सुमारास माणिपूरचा १६ वर्षांचा मुलगा हॅपऊ जादौनांग याने १९३१ मध्ये भारत माता की जयचा नारा दिला होता. शिलाँगमध्येही भारत भती होती. अल्लुरी सीतारामन राजू याने ब्रिटीशांची सत्ता नको म्हणत चळवळ सुरू केली. झारखंडमध्ये बिरसा मुंडा यांनी ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला होता. बिहारमध्येही ब्रिटीशांविरुद्ध लढा सुरू होता. हे सर्व वेगवेगळे भारत मातेकरिता लढत होते. सन १६०० मध्ये हिंदुस्थानचा उल्लेख आला आहे.
विष्णूपुराणातही उल्लेख आहे. २५०० वर्षांपूर्वी भारत राष्ट्राचा आहे. १८०० वर्षे इस्त्राईल गुलाम होता. ६० देशात विखुरलेला होता असे सांगुन चांगल्या मार्गावर चालाल तर चांगल्या ठिकाणी पोहोचाल असे कविश्वर म्हणाले. नमस्ते म्हणजे आत्म्याला नमस्कार. पूजा, खानपानावर आपले राष्ट्र नाही. मध्यंतरी काही विकृती आली आणि ते आपले विचार लादू लागले. ब्रिटीश येण्यापूर्वी आमच्याकडे ७ लाख विद्यालय होते. आम्ही अध्यात्म समजतो आत्मा नंतर आम्ही राष्ट्र समजले पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्य आणि राष्ट्रात अंतर आहे. राज्याची लढाई होऊ शकते राष्ट्राची नाही. भारत सांस्कृतिक दृष्टीने एकत्र आहे हीच राष्ट्रीयीत्वाची ओळख असल्याचे त्यांनी ‘हमारी राष्ट्रीयता’ हा विषय गुंफताना सांगितले.
पंचपरिवर्तन से समाज परिवर्तन या विषयाची बांधणी करताना कविश्वर यांनी ७५ ते १०० वर्षे हा अमृत काळ आहे. रा. स्व. संघाची शताब्दी असल्याने पंचवरिवर्तन हा विषय पुढे आला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रत्येक देशाचा रा. स्व. संघ असावा म्हटले आहे. ब्रिटीशांपूर्वी राजा नव्हता, राज्य नव्हते, दंड नव्हते. धर्माच्या आधारावर एकत्र राहून व्यवहार सुरू होते. धर्म म्हणजे पुजा पद्धती एक नव्हे तर उपासणा स्थान एक असावे असेे सांगून शिक्षण पद्धतीत आपलं भारतीयत्व आलं पाहिजे असे ते म्हणाले. समाजात जागृती आणायची आहे. पण, ती सरकारी नियमांनी नाही. ते परिवर्तन समाजालाच करावे लागेल. समाज परिवर्तन झाला तर विश्वाचे परिवर्तन होईल.
सामाजिक समरतेत त्यांनी स्मशान, पूजा पद्धती, जलस्त्रोत एक असाची यावर भर दिला. पर्यावरण या विषयावर प्लास्टिक टाळा, वृक्ष तोड थांबवा आणि पाणी संवर्धन करण्यावर मार्गदर्शन केले. ‘स्व’ची मांडणी करताना कुटुंबाचे एक वेळचे जेवन एकत्र व्हावे, आठवड्यातून भजन, कीर्तन व्हावे, भूजा, भाषा, भोजन, भ्रमण व्हावे यासह उत्सव आणि सणं स्व संस्कृतीने व्हावे. आपल्या संस्कृतीचे अध:पतन होत असल्यावर त्यांनी चिंताही व्यत केली. मातृभाषा घरात बोलल्या गेली पाहिजे. नागरी कर्तव्याचे पालन केले पाहिजे असे आवाहन करून आपल्या सनातन धर्माचा जन्म नाही त्यामुळे मृत्यू नाही. ज्याची स्थापना होते त्याचा मृत्यू अटळ असल्याचे संदीप कविश्वर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी विचालेल्या प्रश्नांची समर्पक उतरंही त्यांनी दिले.